ETV Bharat / international

Plane Collision Incident: हवेतच झाली असती एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाईन्सच्या विमानांची टक्कर, थोडक्यात टळली - विमाने धडकेपासून बचावल्याचा प्रसंग

एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची विमाने हवेमध्ये टक्कर होण्यापासून बचावली. अपघात होण्याआधीच वॉर्निंग सिस्टमने वैमानिकांना सतर्क केले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दुर्घटना टळली असली तरी, याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Mar 26, 2023, 8:06 PM IST

Updated : Mar 27, 2023, 6:35 AM IST

काठमांडू (नेपाळ): एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची विमाने शुक्रवारी नेपाळमध्ये हवेतच मध्यभागी टक्कर घेणार असतानाच चेतावणी यंत्रणेने वैमानिकांना सतर्क केले आणि त्यांनी त्वरित कारवाई केल्याने मोठा अपघात टळला. ही विमानांची टक्कर टळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपावरून निलंबित केले. CAAN चे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी ही माहिती दिली.

सात हजार फुटांवर आणावे लागले विमान: शुक्रवारी सकाळी क्वालालंपूर, मलेशिया येथून काठमांडूला येणारे नेपाळ एअरलाइन्सचे विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूला येणारे एअर इंडियाचे विमान यांची टक्कर होणार होती. एअर इंडियाचे विमान 19,000 फूट उंचीवरून खाली येत होते, तर नेपाळ एअरलाइन्सचे विमान त्याच वेळी 15,000 फूट उंचीवरून उडत होते, असे निरुला यांनी सांगितले. प्रवक्त्याने सांगितले की, रडारवर दोन विमाने परिसरात असल्याचे दाखविल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचे विमान सात हजार फूट उंचीवरून खाली आले.

तीन सदस्यीय समितीची स्थापना: नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. नेपाळच्या विमान वाहतुकीच्या प्राधिकरणाने याच वेळी नियंत्रण कक्षाचे प्रभारी असलेल्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. सध्या या हवाई घटनेवर एअर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नेपाळमधील पोखरा येथे एक प्रवासी विमान कोसळले होते. या विक्रमांची इंजिन फेल झाल्याने झालेल्या अपघातात विमानातील सर्व ७२ जणांचा मृत्यू झाला. विमानातील 68 प्रवाशांशिवाय 4 क्रू मेंबर्सचाही मृतांमध्ये समावेश आहे. हा अपघात 1992 नंतरच्या सर्वात भीषण विमान अपघातांपैकी एक मानला जातो.

जानेवारीत झाला होता अपघात: याचवर्षी 15 जानेवारी रोजी नेपाळच्या यति एअरलाइन्सचे विमान कोसळून मोठा अपघात नेपाळमध्ये झाला होता. विमानाच्या लँडिंगच्या वेळी पंखांचा कोन उपलब्ध नसल्यामुळे क्रॅश लँडिंग झाल्याचे यानंतर आलेल्या चौकशी अहवालात समोर आले होते. तपास पथकाने दिलेल्या निवेदनात, फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरच्या संशोधन आणि विश्लेषणातून असे दिसून आले होते की, लँडिंगच्या वेळी दोन्ही इंजिनच्या प्रोपेलरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला होता. या विमान अपघातात ५ भारतीय प्रवाशांसह ७२ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: राम सेतूचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Last Updated : Mar 27, 2023, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.