ETV Bharat / international

Afghanistan Earthquake : भय इथलं संपत नाही! दुसऱ्या भूकंपानं अफगाणिस्तान पुन्हा हादरलं - अनेक गावं उद्ध्वस्त झाली

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

Afghanistan Earthquake
Afghanistan Earthquake
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 10:42 AM IST

काबुल Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात पुन्हा एकदा पृथ्वी हादरलीय. अफगाणिस्तनात आज सकाळी 06:11 वाजता पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.1 इतकी मोजली गेली. या भूकंपात जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त मिळालेलं नाही. अफगाणिस्तनात आठवडाभरातील हा दुसरा भूकंप आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. यामुळं लोक घाबरले आणि रस्त्यावर आल्याचं सांगण्यात येतयं. तसंच लोकं खूपच घाबरलेले दिसत आहेत.

भूकंपाचा केंद्रबिंदू कुठं : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलीवर होता. पहिल्या भूकंपाच्या दुर्घटनेतून लोकं सावरले नव्हते, तोच आता भूकंपाचा दुसरा धक्का बसलाय. यापूर्वी झालेल्या भूकंपामुळं अफगाणिस्तानचं मोठं नुकसान झालं होतं. 7 ऑक्टोबर रोजी इथं भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 मोजली गेली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आपत्तीत आतापर्यंत सुमारे 2000 लोकांचा मृत्यू झालाय. तर यात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.

दोन शतकातील सर्वात विनाशकारी भूकंप : अद्यापही ढिगाऱ्याखाली मोठ्या प्रमाणात लोकं दबल्याची माहिती समोर येत आहे. दगड आणि ढिगाऱ्यांवर चढून मृत व जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भूकंपामुळं अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. तालिबान राजवटीनं यासाठी मदत मोहीम राबवली. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानात गेल्या दोन दशकांतील हा सर्वात विनाशकारी भूकंप असल्याचं सांगण्यात येतंय.

20 गावांमधील 1983 घरे उद्धवस्त : तालिबानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयानं सांगितलं की, आतापर्यंत हेरातमधील 20 गावांतील सुमारे 1,983 घरं उद्ध्वस्त झाली आहेत. हेरातमध्ये झालेल्या भूकंपामुळं किती मृत्यू झाले आणि किती जखमी झाले याचा खुलासा मात्र तालिबाननं अद्यापही केलेला नाही. युरोपियन युनियन आणि जागतिक आरोग्य संघटनेनं हेरात भूकंपग्रस्तांना रोख रक्कम, अन्न आणि वैद्यकीय मदत देण्याचं आश्वासन दिलंय.

हेही वाचा :

  1. Afghanistan Earthquake : शक्तिशाली भूकंपानं अफगाणिस्तानमध्ये त्राहीमाम; 30 मिनिटांत 4 धक्के, 2000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू
  2. Afghanistan Earthquake : भूकंपाच्या धक्क्यानं अफगाणिस्तान हादरलं; 320 नागरिकांचा मृत्यू
  3. Suicide Blast in Pakistan: पाकिस्तान आत्मघातकी बॉम्बस्फोटानं हादरलं, किमान ५२ जण ठार तर ५० हून अधिक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.