कीव - युक्रेनमधील रशियाच्या हल्लानंतर युक्रेनमधून जवळपास 45 लाख नागरिकांनी ( ( Migration From Ukraine To Romania ) ) स्थलांतर केले आहे. यापैकी 26 लाख लोकांचे ( Migration From Ukraine To Poland ) पोलंडमध्ये, तर 6 लाख 68 हजार नागरीक रोमानियात ( Migration From Ukraine To Romania ) गेल्याची माहिती आहे. रशियाच्या हल्लानंतर युक्रेनला पाठिंबा देण्यात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली आहे.
रशियाने युक्रेनचे शहर मारियुपोलवर रशियन सैन्याच्या गोळीबारानंतर लोकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. मात्र, मारियुपोलमध्ये किती लोक अडकले याची माहिती मिळू शकली नाही. युद्धापूर्वी या शहरात 4 लाख 30 हजार पेक्षा जास्त लोक राहत होते. मात्र, युद्धानंतर आता अनेकांनी येथून स्थलांतर केले आहे. सद्या मारियुपोलमध्ये सुमारे 1 लाख लोक अडकले आहेत. तर ब्रिटिश संरक्षण अधिकार्यांनी या शहरात 1 लाख 60 हजार लोक अडकल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मारियुपोलमध्ये रशियांच्या हल्ल्यानंतर युक्रेनियन सैन्याने आत्मसमर्पण करण्यास नकार दिला असून शहराचा बराचसा भाग नष्ट झाला आहे.