कॅनबेरा - ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीने विध्वंसक रूप धारण केले आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य न्यू साउथ वेल्समध्ये एका आठवड्यासाठी आपात्काळ घोषित करण्यात आला आहे. राज्यातील शेकडो शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी बहुतांश जनतेला तेथून निघण्यासाठी थोडा काळ उरला असल्याचा इशारा दिला होता.
न्यू साउथ वेल्स राज्यात संपूर्ण आठवडाभरासाठी आपात्काळ घोषित करण्यात आला आहे. याआधी ग्रामीण अग्निशमन सेवा दलाला कोणत्याही सरकारी यंत्रणेला नियंत्रित करून लवकरात लवकर आग विझवण्याचे निर्देश मिळाले आहेत.
या भीषण आगीत तीन जण ठार झाले असून तब्बल 150 घरे जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे राज्यातील जवळजवळ 600 शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
दक्षिण गोलार्धातील या देशात वातावरणातील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्यात हे वातावरण शुष्क आणि शीत काळानंतर निर्माण झाले आहे.