दिमिष्क - सीरियाची राजधानी दिमिष्कमध्ये इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केला. यानंतर सिरियाच्या दक्षिणेकडील भागातील हवाई सुरक्षा सक्रिय करण्यात आली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याला प्रत्युतर देण्यासाठी सीरिया हवाई दल रविवारी रात्री राजधानी दिमिष्क आणि दक्षिण उपनगरामध्ये सक्रिय होते.
इस्रायल आणि सीरियामध्ये सध्या तणावाचं वातावरण आहेइस्रायल गेल्या कित्येक वर्षांपासून सिरियातील इराणशी संबंधित लष्करी तळांवर शेकडो हल्ले केले आहेत. परंतु, या हल्ल्याची त्यांनी कधीच जबाबदारी घेतली नाही. अमेरिकेने गुरुवारी सिरियामधील इराकी सीमेजवळ इराण समर्थीत मिलिशिया संघटनांना लक्ष्य केल्यानंतर हा हल्ला झाल्याची माहिती आहे.