काबुल - अफगाणिस्तानमध्ये काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सात अफगान नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती गंभीर आहे. परिस्थिती सुरक्षितरित्या हातळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे ब्रिटीश लष्कराने रविवारी सांगितले आहे.
तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणाऱ्या नागरिकांची विमानतळावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती ब्रिटीश लष्कराने दिली आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तान : भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन मायदेशी परतले