रियाध - सौदी अरेबियाने गुरुवारी कोरोनाविषाणूविरोधात लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. आरोग्य मंत्रालयाने याची घोषणा केली.
आरोग्यमंत्री तौफिक अल-रबिया यांनी लस घेतल्यानंतर ट्विट केले आहे. 'गेल्या नऊ महिन्यांत मी रुग्णांच्या संख्येवर आणि परिस्थितीवर काळजीपूर्वक नजर ठेवली आहे. आज ही लस मिळालेल्या लोकांच्या संख्येची मी आनंदाने नोंद ठेवेन,' असे त्यांनी यात म्हटले आहे.
हेही वाचा - मॉडेर्ना कंपनीकडून अमेरिका आणखी १० कोटी कोरोना लसीचे डोस घेणार
बुधवारी देशाला लसींची पहिली खेप मिळाली.
देशातील दीड लाखांहून अधिक लोकांनी मोफत लस मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे.
तीन-चरणांच्या लसीकरण प्रक्रियेमध्ये नागरिक आणि देशातील रहिवासी समाविष्ट आहेत, ज्यांना ही लस घेण्याची इच्छा आहे.
गुरुवारपर्यंत, सौदी अरेबियामध्ये कोरोनाचे एकूण 3 लाख 60 हजार 335 रुग्ण आढळले. तर, 6 हजार 80 लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला.
हेही वाचा - दिलासादायक..! ब्रिटन पाठोपाठ अमेरिकेत कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात