इझमीर - तुर्कीच्या पश्चिम किनाऱ्याजवळ बोट उलटून ११ स्थलांतरितांचा मृत्यू झाला. तर, ८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तुर्कीच्या तटरक्षक दलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. शनिवारी हा अपघात घडला.
इझमीर प्रांताच्या सेस्मे शहरात एजियन समुद्रात ही बोट पलटी झाली. यात ११ जणांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये ८ लहान मुलांचा समावेश आहे. स्थानिक अनाडोलू वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
तुर्की हा युद्ध आणि छळ झाल्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या निर्वासितांना युरोपमध्ये शिरकाव करण्यासाठी मुख्य टप्पा मानला जातो. तुर्कीच्या अंतर्गत मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये तुर्कीमध्ये २ लाख ६८ हजार स्थलांतरितांना पकडण्यात आले होते.