लंडन - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर लंडनमध्ये सुरू झालेल्या आंदोलनातील धक्कादायक बाब समोर आली आहे. अंदोलकांनी वेस्टमिंस्टरमधील इंग्लडचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.
'द इव्हनिंग स्टँडर्ड'च्या मते, संसद चौकात उभारलेल्या माजी ब्रिटिश पंतप्रधानांच्या पुतळ्याची रविवारी दुपारी आंदोलकांनी विटंबना केली. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून आंदोलनातील एका गटाने हे कार्य केले. यावेळी इतरांनी त्यांना थांबवण्याचा अपयशी प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वी वॉशिंग्टनमध्ये 'ब्लॅक लाइव्ह मॅटर्स'च्या आंदोलकांनी भारतीय दूतावासाबाहेरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती.