ETV Bharat / international

..तर कोरोनाची परिस्थिती गंभीर होईल, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा - Lack of ban may deepen epidemic crisis

कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजना अधिक कडक कराव्यात, थोडीशी ढिलाई देखील ही महामारी गंभीर होण्यास कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती जागितक आरोग्य संघटनेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

who-top-officials-says-lack-of-ban-may-deepen-epidemic-crisis

author img

By

Published : May 8, 2021, 11:27 AM IST

जिनिव्हा - जगभरात कोरोनाच्या विषाणूने दहशत निर्माण केली आहे. त्यातच हा विषाणू वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येेत आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजना अधिक कडक कराव्यात, थोडीशी ढिलाई देखील महामारी गंभीर होण्यास कारणीभूत ठरू शकते, अशी माहिती जागितक आरोग्य संघटनेच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन सेवा प्रमुख डॉ. मायकल रेयान म्हणाले की, कोरोनाचा व्हायरस वेगाने एका देशातून दुसऱ्या देशात पसरत आहे. आणि देशातील पुढारी हा विचार करत असतील की लसीकरण केल्याने ही महामारी संपेल, तर ते चूक करत आहेत. ही महामारी विषाणूच्या वेगवेगळ्या बदलत्या स्वरूपानुसार आणि मानवी व्यवहारानुसार बदलत असल्याची माहिती रेयान यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या या गंभीर परिस्थितीची वस्तुस्थिती समजून घेऊन ती स्वीकारली पाहिजे, भारतातही कोरोना बधितांचा आकडा आणि मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. रेयान यांच्या मते काही देशाची परवानगी खराब झाली आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्य व्यवस्थेची काळजी घेणे आणि ऑक्सिजनची पूर्तता केली पाहिजे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.