जिनिव्हा - जागतिक आरोग्य संघटनने (डब्ल्यूएचओ) आयोजित केलेल्या विशेष सभेत कोरोना संसर्गामुळे पसरलेल्या महामारीच्या परिस्थितीवर चर्चा झाली. यात जगभरातील प्रत्येक दहा जणांपैकी एक जण कोविड -19च्या संपर्कात आल्याचा अंदाजित अहवाल तयार केला आहे.
हेही वाचा - जागतिक आरोग्य संघटनेकडून ओडिशा सरकारच्या प्रभावी कोविड-19 व्यवस्थापनाचे कौतुक
वृत्तानुसार, 'हा जगातील लोकसंख्येपैकी मोठ्या भागाला निर्माण झालेला धोका आहे. आतापर्यंत 3.5 कोटींहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत. यापुढे हा आकडा 80 कोटींवर पोहोचू शकेल. आतापर्यंत समोर आलेल्या कोरोना रुग्णांच्या प्रकरणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी बऱ्याच दिवसांपूर्वी सांगितले आहे,' असे या बैठकीत सहभागी असलेल्या एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले आहे.
या जागतिक महामारीचा जगावरील परिणामासह आणखी काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
हेही वाचा - चीनच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान एकत्र