मॉस्को - रशिया अमेरिकेविरूद्ध सायबर हल्ले करीत असल्याचे आरोप रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फेटाळून लावले आहेत. तथापि, येत्या दोन दिवसांनी जिनिव्हा येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची व्लादिमीर पुतिन भेट घेणार आहेत.
सायबर हल्ल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की याचा पुरावा कुठे आहे. हा विषय हास्यास्पद होत चालला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्यापासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत अनेक गोष्टींचा आमच्यावर आरोप आहे. असे आरोप लावले जाण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांच्याकडे या आरोपांबाबत काही पुरावे आहेत का? हे फक्त निराधार आरोप आहेत, असे व्लादिमीर पुतीन म्हणाले.
विशेष म्हणजे एप्रिलमध्ये अमेरिकेत झाले ल्या सायबर हल्ल्यानंतर 10 रशियन मुत्सद्दी हद्दपार करण्यात आले होते. तसेच नवीन निर्बंध जाहीर केले होते.