मद्रीद : कोरोना विषाणूचा देशातील वाढता प्रसार पाहता स्पेन सरकारने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यासोबतच, देशात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल, अशी माहिती पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी दिली.
स्थानिक प्रशासनाचे वेगळे निर्बंध..
या आणीबाणीमध्ये स्थानिक प्रशासन आपापल्या भागातील कोरोनाचा प्रसार पाहता आणखी निर्बंध लागू करू शकतात, असे पेद्रो यांनी सांगितले. हे नवे नियम १५ दिवस ते सहा महिन्यांपर्यंत लागू राहू शकतात असेही ते म्हणाले.
स्पेनमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळीही कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट देशात धडकली आहे. त्यामुळे, आता आणीबाणी घोषित करुन, नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
इटलीमध्येही निर्बंध..
स्पेनसोबतच रविवारी इटलीमध्येही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवे निर्बंध लागू करण्यात आले. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा : हाँगकाँगमधील चीनच्या दडपशाहीला तैवानचा विरोध, हजारो नागरिक रस्त्यावर