व्हिएन्ना - ऑस्ट्रियामध्ये अंदाधुंद गोळीबारात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. व्हिएन्ना शहरातील सेगग्याँग भागात हा गोळीबार झाला. पोलिसांच्या गोळीबारात एक हल्लेखोर ठार झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
व्हिएन्ना शहरातील मध्य भागात सध्या पोलीस कारवाई सुरू असून अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे ५० गोळ्या झाडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. या घटनेबाबत सविस्तर वृत्त हाती आले नाही.
फ्रान्समधली चाकू हल्ला
मागील आठवड्यात फ्रान्सनधील पॅरिस शहरात चाकू हल्ल्याची घटना घडली. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. मुस्लीम कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केला होता. प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र काढल्यानंतर फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम देशांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच आंदोलने झाली.