मॉस्को - आण्विक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवण्यात आल्याचे रशियन सरकारने आदेशात म्हटले आहे. या आदेशावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. या आदेशातून रशियन सरकारचे आण्विक हल्ल्याबाबतचे धोरण स्पष्ट झाले आहे.
रशियाचे संघराज्य हे कोणत्याही आण्विक हल्ल्याला त्याचप्रमाणे प्रत्युत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. अथवा देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटनेला विरोध करण्यासाठी असा हल्ला करण्याचा अधिकार राखीव ठेवत असल्याचे रशियन सरकारने आदेशात म्हटले आहे.
रशियाचे धोरण हे संरक्षणात्मक आहे. मात्र, पुरेशा क्षमतेने राहण्याचे रशियाचे ध्येय आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकता राहण्याची हमी रशियन सरकारने जनतेला दिली आहे. रशियाविरुद्धच्या आक्रमणाला रोखणे आणि शत्रूपासून रोखणे यासाठीही संरक्षणाची हमी व्लादिमीर सरकारने जनतेला दिली आहे.
आण्विक हल्ल्याला विरोध करण्यासाठी रशिया हाइपर्सोनिक, लेझर क्षेपणास्त्र वाहून नेणारे, हल्ला करणारे ड्रोन व क्षेपणास्त्र कवच तैनात करणार आहे. आण्विक क्षेपणास्त्रासह इतर क्षेपणास्त्रे शत्रुचा मोठा विध्वंस करण्यासाठी तैनात करण्यात येणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.