मॉस्को - रशियाचे प्रवासी विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात 29 प्रवाशी आहेत. याचबरोबर 6 क्रू मेंबरही विमानात आहेत.
6 जुलैला रशियात कामशाटका येथून दुपारी एएन-२६ एअक्राफ्ट विमान बेपत्ता झाले आहे. याची माहिती रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या व्यवस्थापन विभागाला मिळाली. हे बेपत्ता झालेले विमान पेट्रोपावलोव्सक कामशाटस्काय ते पालाना या मार्गावर प्रवास करत होते. मात्र, या विमानाशी संपर्क निर्माण झाला नसल्याचे आपत्कालीन मंत्रालयाच्या प्रादेशिक विभागाने म्हटले आहे.
हेही वाचा-तक्रार निवारण अधिकारी कधी नेमणार याची माहिती द्या, उच्च न्यायालयाचे ट्विटरला आदेश
फिलिफिन्समध्ये अपघातात 17 जणांचा मृत्यू
फिलिपिन्समध्ये 85 सैन्य घेऊन जाणारे विमान 4 जुलै 2021 रोजी कोसळल्याची घटना घडली आहे. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. तेथील लष्कर प्रमुखांनी याबाबत माहिती दिली आहे. बचाव कार्य सुरू असून सैन्य विमान C-130 मलब्यातून आतापर्यंत काही जणांना वाचवण्यात आले आहे. लष्करी विमान हे सुलु प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याच्या प्रयत्नात होते.
हेही वाचा-वर्ष २०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता; नाना पटोलेंनी केला गंभीर आरोप