ब्रिटन - भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या कॅबीनेट मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्या ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या पहिल्या गृहमंत्री झाल्या आहेत.
-
The Rt Hon Priti Patel @patel4witham has been appointed Secretary of State for the Home Department @ukhomeoffice pic.twitter.com/O5PCExDg8O
— UK Prime Minister (@10DowningStreet) July 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Rt Hon Priti Patel @patel4witham has been appointed Secretary of State for the Home Department @ukhomeoffice pic.twitter.com/O5PCExDg8O
— UK Prime Minister (@10DowningStreet) July 24, 2019The Rt Hon Priti Patel @patel4witham has been appointed Secretary of State for the Home Department @ukhomeoffice pic.twitter.com/O5PCExDg8O
— UK Prime Minister (@10DowningStreet) July 24, 2019
प्रीती पटेल ह्या 'बैक बोरिस’ अभियानाच्या प्रमख सदस्य असल्याने त्यांना कॅबीनेटमध्ये एखादी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता होती. 'मला गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट आहे. मी देशातील लोकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी होईल तो प्रयत्न करेन, याचबरोबर प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी मी तयार आहे', असे त्या म्हणाल्या.
प्रीती पटेल ह्या मूळच्या गुजराती आहेत. ब्रिटनमधील भारतीय लोकांच्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुणे म्हणूण उपस्थिती लावतात. याचबरोबर त्यांनी अनेकवेळा मोदींची प्रशंसा केली आहे.
नुकतेच परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.