लंडन - इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली असून ते आपल्या घरातूनच काम करत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी पत्राद्वारे प्रत्येकाला घरीच राहण्याचे आणि संपर्क टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी लिहिलेले हे पत्र देशातील 3 कोटी लोकांच्या घरी पाठवण्यात आले आहे.
-
PM @BorisJohnson is writing to every UK household to urge them to stay at home, protect the NHS and save lives. #StayHomeSaveLives pic.twitter.com/GMNPqEl10d
— UK Prime Minister (@10DowningStreet) March 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM @BorisJohnson is writing to every UK household to urge them to stay at home, protect the NHS and save lives. #StayHomeSaveLives pic.twitter.com/GMNPqEl10d
— UK Prime Minister (@10DowningStreet) March 28, 2020PM @BorisJohnson is writing to every UK household to urge them to stay at home, protect the NHS and save lives. #StayHomeSaveLives pic.twitter.com/GMNPqEl10d
— UK Prime Minister (@10DowningStreet) March 28, 2020
'आपल्याला माहिती आहे की, परिस्थिती सुधारण्याआधी खराब होईल. त्यासाठी आम्ही योग्य तयारी करीत आहोत. नियमांचे पालन केल्यास कमी जीव गमावावे लागतील आणि लवकर सामान्य जीवन पुन्हा रुळावर येईल. संशोधकांनी दिलेल्या सुचनेनुसार आम्ही योग्य वेळी उपाययोजना केल्या असून यापुढेही कठोर पाऊल उचलण्यास संकोच करणार नाही' , असे जॉन्सन यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
जॉन्सन यांनी कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या डॉक्टर, परिचारिकांसह सर्व जणांचे आभार व्यक्त केले. हजारो सेवानिवृत्त डॉक्टर आणि परिचारिका पुन्हा राष्ट्रीय आरोग्य सेवेवर परत आले आहेत. हजारो नागरिक स्वयंसेवक बनले असून लोकांची मदत करत आहेत. हा क्षण राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही घरीच राहा आणि जीव वाचवा', असे आवाहन जॉन्सन यांनी केले.
दरम्यान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाची लागण झाल्याने स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. इराणमध्येही अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर स्पेनमधील राजघराण्यातील राजकुमारी मारिया टेरेसाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला.