ETV Bharat / international

जागतिक आरोग्य संघटनेच्या निधीत ब्रिटनकडून ३० टक्क्यांची वाढ - stop future pandemics

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भविष्यातील महामाऱ्या रोखण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि द वेलकम ट्रस्ट यांच्यासह एक योजना आखण्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला पुढील चार वर्षांत ३४० दशलक्ष पाऊंड देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. हा निधी ३० टक्क्यांनी वाढला असून त्यामुळे, युके जागतिक आरोग्य संघटनेचा सर्वात मोठा देणगीदार म्हणून पुढे आला आहे.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन
पंतप्रधान बोरिस जॉन्सन
author img

By

Published : Sep 27, 2020, 5:19 PM IST

लंडन - संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील (यूएनजीए) ७५व्या अधिवेशनात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले विचार व्यक्त केले. कोरोनाच्या जागतिक संकटानंतर "आंतरराष्ट्रीय समुदायाची धारणा विखुरलेली दिसते" असे ते म्हणाले.

शनिवारी एका प्री-रेकॉर्डेड भाषणात जॉन्सन म्हणाले, “गेले ९ महिने कोरोनाच्या संकटाचा सामना केल्यानंतरची परिस्थिती पाहता, आपल्याला आंतरराष्ट्रीय समुदायाची कल्पना अगदी स्पष्टपणे, गोंधळलेली दिसत आहे. आणि आपण हे असेच चालू देऊ शकत नाही. जोपर्यंत आपण एकत्रितपणे काम करत नाही, एकजुटीने काम करत नाही तोपर्यंत आपल्या शत्रुला हरवणे अशक्य आहे, असे जॉन्सन म्हणाले. आपण आत्तापासून यासाठी प्रयत्न केले नाही तर, परिस्थिती याहून गंभीर होऊ शकते असेही ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार, ब्रिटनकडून वाढीव निधीची रक्कम पुढील चार वर्षांसाठी निश्चित केली जाणार आहे. यानंतर, ब्रिटन जागतिक आरोग्य संघटनेला फंडिंग करणाऱ्या देशांच्या सूचित प्रथमस्थानी येईल. तसेच, राष्ट्राध्यक्ष निवडणुकांनंतर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला परत निधी देण्यास सुरुवात करतो, तरीही ब्रिटन त्यामानाने अमेरिकेच्या पुढेच राहणार असल्याचेही स्पष्ट होते.

याआधी जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी प्राप्त होत होता. पण, आता ब्रिटनने ४ वर्षांसाठी जागतिक आरोग्य संघटनेला ३० टक्के निधी वाढवून देण्याचे म्हटले आहे. त्यामुस जागतिक आरोग्य संघटनेला ब्रिटनकडून जवळपास ३४० दशलक्ष पाऊंड निधी उपलब्ध होईल. मात्र, याबदल्यात ब्रिटन जगभरातील देशाकडून ब्रिटन कोरोनाशी लढा देण्यासाठी वापरण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतचा सरळ रिपोर्टदेखील जागतिक आरोग्य संघटनेकडून मागवू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.