ETV Bharat / international

लंडन ब्रिज हल्ला : हल्लेखोर पोलिसांकडून ठार; चाकू हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू - लंडन महापौर सादीक खान

सध्या लंडन ब्रिज परिसरात कशी परिस्थिती आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे. लंडन रुग्णवाहिका सेवेने ही मोठी घटना असल्याचे जाहीर केले.  लंडन ब्रिजवर काही लोक घाबरून पळत असल्याचे सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे

Feared citizen
घाबरलेले नागरिक
author img

By

Published : Nov 30, 2019, 1:26 AM IST

Updated : Nov 30, 2019, 2:14 AM IST

लंडन - शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या लंडन ब्रिजवरील चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घाळून ठार केल्याचे स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी म्हटले आहे. हा हल्ला दहशतवादी असल्याचे मानून तपास सुरू करण्यात आल्याचे स्कॉटलँड यार्डने माहिती दिली.

सध्या लंडन ब्रिज परिसरात कशी परिस्थिती आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे. लंडन रुग्णवाहिका सेवेने ही मोठी घटना असल्याचे जाहीर केले. लंडन ब्रिजवर काही लोक घाबरून पळत असल्याचे सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.

feared citizen
घाबरलेले नागरिक पळताना

लंडन ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच कार्यालये आणि इमारतीमध्ये लोक तिथेच अडकून पडले.

Police at London Bridge
दक्ष असलेले लंडन पोलीस

इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सोडून डाऊनिंग स्ट्रीटवर परतले आहेत. ते म्हणाले, मी लंडन ब्रिजमधील घटनेची अद्ययावत माहिती घेत आहे. पोलीस आणि आपतकालीन सेवेने तातडीने प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

Police at London Bridge
पोलिसांची चोख सुरक्षाव्यवस्था

इंग्लंडच्या गृह सचिव प्रिती पटेल यांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंतीही पटेल यांनी नागरिकांना केली.

feared citizen
घाबरलेले नागरिक पळताना

लंडनचे महापौर सादीक खान यांनी ती घटना भयंकर असल्याचे म्हटले आहे. अशा हल्ल्याने आपल्यात दुफळी करण्यात त्यांना यश मिळणार नाही, असा महापौर सादिक यांनी विश्वास व्यक्त केला.

Police at London Bridge
कडक सुरक्षाव्यवस्था

Intro:Body:

Dummy News

Conclusion:
Last Updated : Nov 30, 2019, 2:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.