बर्लिन - तुर्की आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांद्वारे सीरियातील कुर्दांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रांमध्ये लष्करी मोहीम उघडली आहे. जर्मनीच्या विविध शहरांमध्ये 20 हजार कुर्दांनी तुर्कीच्या लष्करी मोहिमेविरोधात निदर्शने केली.
सीरियात तुर्की आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांद्वारे लष्करी मोहीम सुरू आहे. याविरोधात जर्मनीतील विविध शहरांमध्ये 20 हजार कुर्दांनी निदर्शने केली. कोलोन शहरात सर्वाधिक 10 हजाराहून अधिकांनी रॅली काढली. तर, फ्रँकफुर्टमध्ये जवळपास 4 हजार, हॅम्बर्गमध्ये 3 हजार लोकांनी निदर्शने केली. याशिवाय, बनोवर, ब्रेमेन, बर्लिन आणि सारब्रुकेनमध्येही विरोधप्रदर्शन करण्यात आले.
यातून निदर्शकांनी तुर्कीवर राजनैतिक दबाव आणण्याची मागणी केली. तसेच, कुर्दिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. पोलिसांनी निदर्शकांना कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) च्या झेंड्याचा वापर न करण्याचा इशारा दिला. तुर्की आणि जर्मनीत पीकेके संस्थापक अब्दुल्ला ओकलानची छायाचित्रे आणि झेंडा प्रतिबंधित आहे.
बुधवारी तुर्की आणि त्याच्या मित्र राष्ट्रांद्वारे उत्तर सीरियात कुर्द विद्रोह्यांच्या विरोधात चालवण्यात आलेल्या लष्करी मोहिमेत ३० लोक मारले गेले, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.