रोम- कोरोना व्हायरसच्या संक्रमनामुळे इटलीत आत्तापर्यंत 5 हजार 500 जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोनामुळे जगातील सर्वात जास्त मृत्यु ईटलीत झाले आहेत. रविवारी आणखी 651 जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा आकडा समोर आला आहे. इटलीत एकून 59 हजार नागरिकांना संसर्ग झाला असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. देशामध्ये आरोग्य आणिबाणी लागू करण्यात आली आहे.
ईटलीवरील कोरोनाच संकट दिवसंदीवस गडद होताना दिसत आहे. आरोग्यसेवांच्या बाबतीत जागतीक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ईटलीत कोरोनामुळे सर्वाधीक नागरिकांचा बळी गेला असून यात वाढ होताना दिसत आहे. रविवारी नोंदवल्या गेलेली आकडेवारी ही एकाच दिवशी मत्यु झालेल्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रविवारी आणखी 651 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा 5 हजार 500 वर गेला आहे.