ETV Bharat / international

इराकमध्ये तैग्रिस नदीत बोट उलटल्याने ५५ ठार - tigris river

इराकमध्ये तैग्रिस नदीत बोट उलटल्याने ५५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश आहे. ही फेरी बोटी असून त्यात क्षमतेपेक्षा अधिकजण बसवण्यात आले होते. या बोटीवर किमान १५० लोक होते. त्यात ८० महिलांचा समावेश होता, असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ-एल-बद्र यांनी सांगितले.

मोसूल
author img

By

Published : Mar 22, 2019, 4:02 PM IST

मोसूल - इराकमध्ये तैग्रिस नदीत बोट उलटल्याने ५५ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये १२ लहान मुलांचा समावेश आहे. ही फेरी बोटी असून त्यात क्षमतेपेक्षा अधिकजण बसवण्यात आले होते. या बोटीवर किमान १५० लोक होते. त्यात ८० महिलांचा समावेश होता, असे आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते सैफ-एल-बद्र यांनी सांगितले.

'ही बोट जात असताना धरणाचे दरवाजे उघडल्याने पाण्याची पातळी वाढली. तसेच, पाणी वेगाने वाहू लागले. मात्र, जलस्रोत विभागाने याबाबत काही दिवस आधीच माहिती दिली होती,' असे निनेवेहचे महापौर अब्द-अल-सत्तार हबू म्हणाले.
'नदीच्या एका काठावरून एका छोट्या बेटाकडे पर्यटकांना घेऊन जात असताना ही बोट उलटली. बोट अर्ध्या वाटेत आली असताना पाण्याची पातळी अचानक वाढल्याने हा अपघात घडला,' अशी माहिती त्यांनी दिली.

'या बोटीत क्षमतेच्या आणि परवानगीच्या दुप्पट प्रवासी भरले होते,' असे नागरी संरक्षण व्यवस्थापक ब्रिगेडियर मलिक बोहान यांनी सांगितले आहे.

Intro:Body:

इराकमध्ये तैग्रिस नदीत बोट उलटल्याने ५५ ठार

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.