ETV Bharat / international

अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय मूर्खपणाचा, टोनी ब्लेअर यांची परखड टीका - अफगाणिस्तान सैन्य माघार

ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका करताना हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे. ब्लेअर यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून एक दीर्घ लेख लिहून सैन्य माघारीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे.

अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय मूर्खपणाचा, टोनी ब्लेअर यांची परखड टीका

author img

By

Published : Aug 22, 2021, 5:48 PM IST

Updated : Aug 22, 2021, 6:19 PM IST

लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या अमेरिकेच्या निर्णयावर टीका करताना हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचे म्हटले आहे. ब्लेअर यांनी त्यांच्या संकेतस्थळावरून एक दीर्घ लेख लिहून सैन्य माघारीच्या निर्णयावर सडकून टीका केली आहे.

अचानक सैन्य माघारीमुळे तालिबानचा पुन्हा उदय

अफगाणिस्तानातून अचानक आणि गोंधळाच्या स्थितीत सैन्य माघारी घेतल्याने तालिबानला इथे पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली. यामुळे गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानात जे काही मिळविले गेले ते सर्व काही गमवावे लागले. नागरिकांची उंचावलेली जीवनशैली, महिलांचे शिक्षण अशा सर्व प्रकारचे यश यामुळे गमवावे लागले असे ब्लेअर यांनी म्हटले आहे.

अफगाणला वाऱ्यावर सोडणे दुर्दैवी

अफगाणिस्तान आणि तिथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडणे दुर्दैवी, धोकादायक, अनावश्यक असल्याचे ब्लेअर यांनी म्हटले. हे ना अफगाणिस्तानच्या हिताचे आहे ना आपल्या हिताचे आहे असे ब्लेअर यांनी या लेखात स्पष्टपणे म्हटले आहे. टोनी ब्लेअर हे 1997 ते 2007 अशा दीर्घ कालावधीसाठी ब्रिटनचे पंतप्रधान राहिले असून 2003 मधील अमेरिकेच्या नेतृत्वातील इराक युद्धाला ब्लेअर यांनी पाठिंबा दिला होता. 9/11 हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात ब्रिटिश सैन्यही त्यांनी पाठविले होते.

सैन्य माघारीचा निर्णय राजकारणातून

पाश्चात्यांची भूमिका काय आहे याविषयी सध्या संपूर्ण जग अनिश्चित आहे, कारण अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय व्यापक धोरणाऐवजी राजकारणातून घेण्यात आल्याची टीका ब्लेअर यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सर्व युद्ध संपविण्याच्या मूर्ख राजकीय घोषणेचे पालन केल्याचा आरोप ब्लेअर यांनी केला आहे.

अफगाण नागरिकांना आसरा देणे आपली जबाबदारी

ज्यांची जबाबदारी आपल्यावर आहे, जे अफगाणी आपल्यासोबत राहिले आणि ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून आसरा देणे ही आपली जबाबदारी असल्याचेही ब्लेअर यांनी म्हटले आहे. सैन्य माघारीच्या निर्णयाविषयी ब्रिटनला अंधारात ठेवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जागतिक महासत्तांमध्ये फूट पडण्याचा धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात दिला गोंडस मुलीला जन्म!

Last Updated : Aug 22, 2021, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.