बर्लिन - एका मुलाखतीदरम्यान जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हाइको मास यांनी जर्मनी आणि अमेरिकेचे संबंध फारच गुंतागुंतीचे असल्याचे म्हटले आहे. सोबतच, अमेरिकतील अंतर्गत वाद आणि कलह यामुळे आंतरराष्ट्रीय तणावात आणखी भर पडेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी यूएस सैन्य दलाला(मिलीटरी) जर्मनीच्या ९ हजार ५०० सैनिकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर अमेरिका हा जर्मनीमध्ये आपल्या सैनिकांना तैनात करत आला आहे. सध्या जर्मनीमध्ये नाटोच्या सहयोगासह दीर्घकालीन व्यवस्थेचा भाग म्हणून अमेरिकेचे जवळपास ३४ हजार ५०० कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आले आहेत.
ऑनलाईन मीडियाच्या रिपोर्टनुसार, आपण दशकांपासून अमेरिकी सैन्याबरोबर विकसित होत असलेल्या सहयोगाचे कौतुक करत असल्याचे हाइको मास म्हणाले आहेत. ही सहयोगाची भावना दोन्ही देशांच्या हितार्थ आहे. जर्मनी आणि अमेरिकेच्या संबंधाबाबत बोलताना, त्यांनी आम्ही ट्रान्स-अटलांटिक अलायंसनुसार खूप जवळचे भागीदार आहोत मात्र, हे सर्व फारच किचकट असल्याचे मास म्हणाले. तसेच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारामुळे अमेरिकेचे ध्रुवीकरण होऊ शकते आणि लोक-राजकारणाचे भांडवल होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. यामुळे, देशांतर्गत असलेले सह-अस्तित्वदेखील आणखी कठोर बनेल. सोबतच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघर्षांनाही ते उत्तेजन देईल, असे ते म्हणाले.
अमेरिकन पोलीस कर्मचार्यांद्वारे वंशवादाविषयी निषेध करणार्या ट्रम्प यांच्या कठोर भूमिका आणि अमेरिकेच्या जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूबद्दल विचारले असता मास म्हणाले, अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीत पुढील हिंसाचाराची धमकी देणे धोकादायक आहे असे त्यांचे मत होते. सोबतच, त्यांनी रिपब्लिकनचे माजी राष्टपती जॉर्ज बूश आणि सद्याचे डेमोक्रेटिक राष्ट्रपती पदाचे दावेदार जो बिडन यांनी नस्लवाद विरोधात दिलेल्या प्रतिक्रियेचे त्यांनी कौतुक केले. तसेच, दोन्ही गटात जबाबदार योग्य कौशल्य असलेल्या व्यक्ती असून समजदार आणि जाणकार लोकांचा विजय होईल अशी आशा असल्याचेही त्यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले.