नॉर्वे - 'गेम ऑफ थ्रोन' या विदेशी वेब सिरीजचा कलाकार क्रिस्तोफर हिवजू याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. "मला कोरोना आजार झाला असून, मी आणि माझे कुटुंब घरीच उपचार घेत आहोत. आमच्यामध्ये कोरोनाचे कमी प्रमाणात लक्षणे आहेत." अशाप्रकारे क्रिस्तोफरने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरून माहिती दिली आहे. त्याने 'गेम ऑफ थ्रोन' या वेब सिरीजमध्ये 'टॉरमंड दिग्गजबाइन' ही व्यक्तीरेखा साकारली होती. ती खूप गाजली होती.
काही कोरोनाग्रस्त लोक काळजी न घेता धोका पत्करून बाहेर पडत आहेत. तर काही सामान्य लोकही बाहेर पडत आहेत. अशांना मी आवाहन करतो की, आपण खूप काळजीपूर्वक राहायला हवं. समोरील व्यक्तीपासून 1 ते 5 मीटर अंतर ठेवावे, सारखे सारखे हात धुवावेत. आपण एकत्र मिळून कोरोना नावाच्या विषाणूला पळवून लावू शकतो. त्यासाठी एकमेकांची काळजी घेतली तर आपण निरोगी राहू, असा सल्ला आणि आवाहन क्रिस्तोफर यांनी आपल्या इंस्टाग्रामच्या खात्यावरून केले आहे.