बमाको - फ्रान्सच्या सुरक्षा दलाने अल कायदाचा उत्तर आफ्रिकेत म्होरक्या असलेल्या अब्देलमलेक ड्रूकडेल याला ठार केले आहे. अनेक वर्षांपासून जिहादी विरोधातील फ्रान्सच्या लढ्याला आलेले हे मोठे यश मानले जात आहे. ही माहिती फ्रान्सचे संरक्षण मंत्री यांनी शुक्रवारी दिली.
अब्देलमलेक ड्रूकडेलच्या मृत्यूबाबत अद्याप इस्लामिक माघ्रेबने (एक्यूआयएम) पुष्टी दिलेली नाही. या दहशतवादी संघटनेने अनेक विदेशी नागरिकांचे अपहरण करून लक्षावधी डॉलर रुपये खंडणीतून मिळवले आहेत.
फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्लि यांनी ट्विट करून अब्देलमलेकच्या मृत्यूची माहिती दिली आहे. हा दहशतवादी त्याच्या अनेक सहकाऱ्यांबरोबर उत्तर मालीमध्ये ठार झाल्याचे फ्लोरेन्स यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दहशतवादी अब्देलमलेक ड्रूकडेलने याने साहेल प्रांताच्या सरकारला फ्रान्सचे सैन्यदल काढून घेण्याची काही महिन्यांपूर्वी विनंती केली होती.
अल कायद्याशी संबंधित असलेल्या या दहशतवाद्याने अल्जीरियामधील अनेक आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यामध्ये 2000 ला अल्जेरियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीवरील झालेल्या हल्ल्याचा समावेश होता.