व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) - या आठवड्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली आहेत. अनेक छाप्यांनंतर आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात चार जण ठार झाले.
ताज्या वृत्तानुसार, ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमेर यांनी सांगितले की, 20 वर्षीय इस्लामी कट्टरपंथी बंदूकधारी कुझीम फेजजुलाई याच्याशी संबंधित 14 जणांना व्हिएन्ना परिसर, सेंट पॉल्टन टाऊन आणि लिन्झ सिटी येथून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात दुसर्या हल्लेखोरांचा सहभाग असण्याची चिन्हे दिसत नसली तरी इतक्यात ही शक्यताही नाकारता येणार नाही, असे नेहमर यांनी सांगितले.
हेही वाचा - तुर्की : भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 114 वर, बचावकार्य पूर्ण
सोमवारी संध्याकाळी व्हिएन्नाच्या साइटेनस्टेटेनगास सिनागॉग (ज्यू धर्मातील उपासना स्थळ) जवळून निघालेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. हा प्रकार सुरू झाल्यानंतर पोलिसांनी बंदुकधारी फेजजुलाई याला गोळ्या घालून ठार केले होते. इस्लामिक स्टेट (आयएस) जिहादींमध्ये सामील होण्यासाठी एप्रिल 2019 पासून हा बंदूकधारी सीरियाला जाण्याचा प्रयत्न करीत होता.
फ्रान्समधली चाकू हल्ला
याआधीच्या आठवड्यात फ्रान्सनधील पॅरिस शहरात चाकू हल्ल्याची घटना घडली. यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. मुस्लीम कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केला होता. प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र काढल्यानंतर फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम देशांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच आंदोलने झाली.
हेही वाचा - फिलिपाईन्समध्ये गोनी चक्रीवादळातील मृतांचा आकडा वाढून 16 वर