ETV Bharat / international

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियात दाखल; शांघाय सहकार संस्थेच्या बैठकीला राहणार उपस्थित - राजनाथ सिंह रशिया दाखल

शांघाय सहकार संस्थेचे सदस्य असणाऱ्या आठही देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत. प्रादेशिक सुरक्षितता, दहशतवाद अशा विषयांवर या बैठककीदरम्यान चर्चा होणार आहे. या संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमातणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे...

Defence Minister Rajnath Singh reaches Russia for SCO meet
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियात दाखल; शांघाय सहकार संस्थेच्या बैठकीला राहणार उपस्थित
author img

By

Published : Sep 3, 2020, 8:53 AM IST

मॉस्को : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे बुधवारी रात्री रशियामध्ये दाखल झाले. ते तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शांघाय सहकार संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच, रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत ते द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत.

शांघाय सहकार संस्थेचे सदस्य असणाऱ्या आठही देशांचे संरक्षणमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत. प्रादेशिक सुरक्षितता, दहशतवाद अशा विषयांवर या बैठककीदरम्यान चर्चा होणार आहे. शांघाय सहकार संस्थेमध्ये भारत, चीन, कझाकिस्तान, क्रिगिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. या संस्थेचे दोन महत्त्वाचे सदस्य - भारत आणि चीनदरम्यान सुरू असलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

  • Здравствуйте Russia!
    Reached Moscow this evening. Looking forward to my bilateral meeting with the Russian Counterpart General Sergey Shoygu tomorrow. https://t.co/FgayfbJIIR

    — Rajnath Singh (@rajnathsingh) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Raksha Mantri Shri @rajnathsingh reached Moscow on a three day visit to Russia. He was received by
    Major General Bukhteev Yury Nikolaevich at the Airport. pic.twitter.com/fuahxEkZRe

    — रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चार सप्टेंबरला ही बैठक पार पडणार आहे. याव्यतिरिक्त राजनाथ सिंह हे रशियाचे संरक्षण मंत्री सर्जे शोईजू यांच्यासोबत आणि इतर काही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत विविध लष्करी कार्यक्रमांबाबत चर्चा करतील. त्यानंतर ५ सप्टेंबरच्या सायंकाळी ते मायदेशी येण्यासाठी निघतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एससीओच्या बैठकीला चीनचे संरक्षण मंत्री जनरल वेई फेंघे हेदेखील उपस्थित असणार आहेत. राजनाथ सिंह आणि वेई यांच्यादरम्यान द्विपक्षीय चर्चा होऊ शकते का, असे विचारले असता अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली.

दरम्यान, रशियाने यापूर्वीच भारत आणि चीनच्या सीमावादामध्ये आपण पडणार नाही, अशी भूमीका घेतली आहे. दक्षिण आशियामधील स्थैर्यासाठी, दोन्ही देशांनी आपापसात चर्चा करुन यावर तोडगा काढावा, असे रशियाने म्हटले होते.

भारत-रशिया द्विपक्षीय चर्चा..

रशियाच्या संरक्षण मंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंह हे रशियाला विविध शस्त्रास्त्रे ही लवकरात लवकर पुरवण्यासंबंधी चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच, एके२०३ रायफल्सचे भारतामध्ये उत्पादन घेण्यासंबंधीचा प्रलंबित प्रस्तावही या बैठकीमध्ये अधिकृतरित्या मान्य करण्यात येऊ शकतो. तसेच, राजनाथ सिंह हे रशियाला एस-४०० क्षेपणास्त्रे वेळेत पोहोचवण्यासंबंधी आठवण करुन देऊ शकतात.

हेही वाचा : ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020 : पहिल्या ५० देशांमध्ये भारताचाही समावेश!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.