रोम - इटलीमध्ये गेल्या 24 तासांत कोविड - 19 चे नवे कोरोनाव्हायरसचे 25 हजार 271 रुग्ण आढळले आहेत. याच काळात 356 मृत्यूंची नोंदही झाली आहे. नवीन रुग्णांसह संक्रमित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 60 हजार 373 वर पोहोचली आहे. तर, मृत्यूंची संख्या 41 हजार 750 वर पोहोचली. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालानुसार, सोमवारी समोर आलेल्या 32,616 नवीन रुग्णांच्या आकडेवारीत थोडीशी घसरण झाली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळले आहेत.
देशातील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 5 लाख 73 हजार 334 आहे, त्यातील बहुतेक जण (5 लाख 42 हजार 849) सध्या घरात विलगीकरणात आहेत.
नवीन आकडेवारीनुसार, रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 249 पर्यंत वाढली आहे.
हेही वाचा - मेक्सिकोमध्ये कोसळधार! भूस्खलन आणि पूरात 27 लोकांचा मृत्यू
अॅब्रुज्झोचे राज्यपाल मार्को मार्सिलियो यांनी सोमवारी एन्सा वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अॅब्रुज्झो, अंब्रिया, तोस्काना, लिगुरिया आणि बॅसिलिकाटाचा भाग ऑरेंज जॉन म्हणून घोषित केला जाईल. याचा अर्थ असा होतो की, येथील धोका मध्यम पातळीवर आहे.
कोरोनाच्या साथीच्या दुसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सरकारने 7 नोव्हेंबरला तीन स्तरीय यंत्रणा सुरू केली. त्याअंतर्गत देश तीन भागात विभागलेला आहे. पिवळ्या म्हणजे कमी जोखमीच्या, केशरी म्हणजे मध्यम जोखीम आणि लाल म्हणजे अधिक जोखमीचे क्षेत्र अशी ही क्षेत्रे आहेत.
रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत राष्ट्रीय कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ही यंत्रणा 3 डिसेंबरपर्यंत लागू राहील. आतापर्यंत लोम्बार्डी, पीडमोंट, एओस्टा व्हॅली आणि कॅलेब्रिया ही चार क्षेत्रे रेड झोनअंतर्गत ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा - होंडुरासमध्ये उष्णकटिबंधीय वादळ एटाने घेतले 57 बळी