लंडन - इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिवाळीच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रिटीश हिंदू, शीख आणि जैन यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी इतरांना मदत केल्याचे पंतप्रधान जॉन्सन यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी कोरोना महामारीवर विजय मिळवू, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यंदाच्या दिवाळीवर कोरोनाची पडछाया असेल, याविषयीही जॉन्सन यांनी मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे त्यांनी आवाहन केले.
-
Happy #Diwali and #BandiChhorDivas!
— Boris Johnson (@BorisJohnson) November 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I know that this year celebrations will be different, but I am filled with respect for the way British Hindus, Sikhs and Jains have gone out of their way to help others throughout this pandemic. pic.twitter.com/YhqWpq3JQH
">Happy #Diwali and #BandiChhorDivas!
— Boris Johnson (@BorisJohnson) November 14, 2020
I know that this year celebrations will be different, but I am filled with respect for the way British Hindus, Sikhs and Jains have gone out of their way to help others throughout this pandemic. pic.twitter.com/YhqWpq3JQHHappy #Diwali and #BandiChhorDivas!
— Boris Johnson (@BorisJohnson) November 14, 2020
I know that this year celebrations will be different, but I am filled with respect for the way British Hindus, Sikhs and Jains have gone out of their way to help others throughout this pandemic. pic.twitter.com/YhqWpq3JQH
काय म्हणाले जॉन्सन व्हिडिओमध्ये?
नमस्ते आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. मला माहित आहे, यावर्षी दिवाळीचा उत्सव वेगळा असणार आहे. लक्षावधी दिवे पुन्हा प्रज्वलित झाले आहेत. दिवाळीचा आनंद दिसत आहे. देशातील अनेकांनी मोठा त्याग केला आहे. मला माहित आहे, तुमचे काम आणि व्यवसाय विस्कळित झाले आहे. जग अंधारातून जात असताना लाखो दिव्यांच्या प्रकाशाने भविष्याबाबत आशा निर्माण झाली आहे. दिवाळी हा अंधकारावरील प्रकाशाचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे कोरोनावर आपण मात करू, असा मला विश्वास आहे. सर्वजण एकत्रिपणे येत कोरोनाच्या विषाणुला हरवू, असे त्यांनी आवाहन केले.