ETV Bharat / international

Ukraine Chernobyl Disaster : इतिहासातली सर्वाधिक दाहक चेर्नोबिल अणुऊर्जा दुर्घटना, हजारो लोकांचा मृत्यू; वाचा 26 एप्रिल 1986 रोजी नेमकं काय घडलं होतं?

रशियन सैन्याने युरोपमधील सर्वांत मोठा अणुऊर्जा ( Europe's biggest nuclear power plant ) प्रकल्प असलेल्या झापोरिझिया एनपीपीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी टि्वट करून माहिती दिली. जर अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट झाला, तर तो चेर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा असेल, असे त्यांनी म्हटलं. 26 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामध्ये असलेल्या आणि आता युक्रेनमध्ये असलेल्या चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्रात एका चाचणीदरम्यान मोठा स्फोट झाला होता. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

अणुस्फोट
Ukraine Chernobyl Disaster
author img

By

Published : Mar 4, 2022, 10:46 AM IST

कीव - रशिया-युक्रेन संघर्ष अधिक तिव्र होत चालला आहे. युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी रशियाकडून मोठा गोळीबार करण्यात येत आहे. रशियन सैन्याने युरोपमधील सर्वांत मोठा अणुऊर्जा ( Europe's biggest nuclear power plant ) प्रकल्प असलेल्या झापोरिझिया एनपीपीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याबाबत युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी टि्वट करून माहिती दिली. रशियन सैन्य अणुऊर्जा प्रकल्पावर ( Chernobyl Nuclear Power Plant ) सर्व बाजूंनी गोळीबार करत आहे. आग आधीच भडकली आहे. जर तो स्फोट झाला तर तो चेर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा असेल, असे युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी म्हटलं.

झापोरिझिया हा अणुऊर्जा प्रकल्प एनरहोदर येथे आहे. नीपर नदीवरील शहर आहे, जे देशाच्या वीज निर्मितीच्या एक चतुर्थांश भाग आहे. प्लांटच्या प्रवक्त्याने गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला होता असे सांगितले. अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार झाल्याच्या वृत्तानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या फोनवरून संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. बायडेन यांनी रशियन-प्रभावित प्रदेशातील लष्करी हालचाली त्वरित थांबविण्याचे आणि आपत्कालीन बचाव पथकांना तेथे जाण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसने ही माहिती जारी केलेल्या निवेदनात दिली.

चेर्नोबिल अणुऊर्जा दुर्घटना काय आहे?

रशिया आजही चेर्नोबिल दुर्घटनेचे दुष्परिणाम भोगत आहे. चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. 26 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामध्ये असलेल्या आणि आता युक्रेनमध्ये असलेल्या चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्रात एका चाचणीदरम्यान मोठा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर वायु गळतीला सुरुवात झाली. स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आणून वायु गळती रोखण्याच्या प्रयत्नात 56 कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच वायु गळतीमुळे रेडिएशनचे उत्सर्जन होऊन ते सर्वदूर पसरले. या भागातून लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले. या भागातून त्यावेळी सुमारे साडेतीन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. ही घटना इतिहासात चेर्नोबिल अणू दुर्घटना म्हणून प्रसिद्ध आहे.

चेर्नोबिल घटनेने जग आजही हादरते?

चेर्नोबिल स्फोटानंतर संपूर्ण युरोप हादरला होता. या स्फोटाचा अमेरिकेवरही परिणाम झाला होता. या घटनेमुळे हजारो निष्पाप लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मृत्यू झाला. या अपघातामुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली होती.

हेही वाचा - Russia-Ukraine war LIVE Updates : अणू उर्जा प्रकल्प गोळीबारामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी, होऊ शकतो चर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा विध्वंस, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.