नवी दिल्ली - फ्रान्सपाठोपाठ आता जर्मनीनेही जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला युरोपियन महासंघात (ईयू) दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा दिला आहे. फ्रान्सने शुक्रवारीच (१५ मार्च) मसूदची फ्रान्समधील मालमत्ता गोठवण्याचा निर्णय घेतला होता.
जर्मन दूतावासाचे प्रवक्ते हॅन्स क्रिस्टियन विंकलर यांनी ही माहिती दिली. 'सध्या युरोपियन महासंघात मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याविषयी चर्चा चालू आहे. जर्मनीने याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच, फ्रान्सशीही बोलणी सुरू आहे. युरोपियन महासंघातील सर्व सदस्य देशांची संमती मिळताच सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंबंधी निर्णय घेण्यात येईल,' असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने चौथ्यांदा खोडा घातला. या मागणीचा ठराव फ्रान्सने केला होता. त्याला संयुक्त राष्ट्रांतील १५ सदस्य देशांपैकी सर्वांनी पाठिंबा दिला असताना एकट्या चीनने व्हिटो अधिकाराचा वापर करत दहशतवादी मसूद अझहर याला झुकती बाजू दिली. यामुळे हा ठराव रद्द झाला. मागील १० वर्षांपासून 'व्हिटो' अधिकाराचा वापर करत पाकिस्तानला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा विडा उचलला आहे. यावरती भारताने नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर 'दहशतवादाविरोधात लढण्यासाठी फ्रान्सने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे आणि पुढेही भारताच्या बाजूलाच राहील,' असे निवेदन ३ दिवसांतच फ्रान्स सरकारकडून जारी करण्यात आले. तसेच, इतर युरोपीय मित्र देशांसमोरही हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. आता या प्रयत्नांमुळे जर्मनीनेही सकारात्मक भूमिका घेत युरोपियन महासंघात मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा दिला आहे.
फ्रान्सनंतर जर्मनीचाही मसूद अझहरला 'ईयू'मध्ये दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा - terrorist
'दहशतवादाविरोधात लढण्यासाठी फ्रान्सने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे आणि पुढेही भारताच्या बाजूलाच राहील,' असे निवेदन फ्रान्स सरकारने म्हटले होते. आता जर्मनीनेही जैशचा म्होरक्या मसूद अझहरला युरोपियन महासंघात (ईयू) दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा दिला आहे.
नवी दिल्ली - फ्रान्सपाठोपाठ आता जर्मनीनेही जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला युरोपियन महासंघात (ईयू) दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा दिला आहे. फ्रान्सने शुक्रवारीच (१५ मार्च) मसूदची फ्रान्समधील मालमत्ता गोठवण्याचा निर्णय घेतला होता.
जर्मन दूतावासाचे प्रवक्ते हॅन्स क्रिस्टियन विंकलर यांनी ही माहिती दिली. 'सध्या युरोपियन महासंघात मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याविषयी चर्चा चालू आहे. जर्मनीने याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच, फ्रान्सशीही बोलणी सुरू आहे. युरोपियन महासंघातील सर्व सदस्य देशांची संमती मिळताच सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंबंधी निर्णय घेण्यात येईल,' असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनने चौथ्यांदा खोडा घातला. या मागणीचा ठराव फ्रान्सने केला होता. त्याला संयुक्त राष्ट्रांतील १५ सदस्य देशांपैकी सर्वांनी पाठिंबा दिला असताना एकट्या चीनने व्हिटो अधिकाराचा वापर करत दहशतवादी मसूद अझहर याला झुकती बाजू दिली. यामुळे हा ठराव रद्द झाला. मागील १० वर्षांपासून 'व्हिटो' अधिकाराचा वापर करत पाकिस्तानला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा विडा उचलला आहे. यावरती भारताने नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर 'दहशतवादाविरोधात लढण्यासाठी फ्रान्सने नेहमीच भारताची बाजू घेतली आहे आणि पुढेही भारताच्या बाजूलाच राहील,' असे निवेदन ३ दिवसांतच फ्रान्स सरकारकडून जारी करण्यात आले. तसेच, इतर युरोपीय मित्र देशांसमोरही हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. आता या प्रयत्नांमुळे जर्मनीनेही सकारात्मक भूमिका घेत युरोपियन महासंघात मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा दिला आहे.
फ्रान्सनंतर जर्मनीचाही मसूद अझहरला 'ईयू'मध्ये दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा

Conclusion: