ETV Bharat / international

corona outbreak: इटलीमध्ये मागील २४ तासांत ४७५ बळी, तर जगभरात ९७५ दगावले

काल (गुरुवारी) दिवसभरात कोरोना संसर्गांमुळे तब्बल ४७५ जणांचा इटलीत मृत्यू झाला आहे. तर जगभरामध्ये २४ तासात जगभरात ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

coronaoutbreak
कोरोना विषाणू
author img

By

Published : Mar 19, 2020, 9:58 AM IST

मिलान - चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातले. त्यानंतर आता युरोप हा कोरोना संसर्गाचा नवा केंद्रबिंदू झाला आहे. युरोपातील इटली या देशात आत्तापर्यंत २ हजार ९०० जणांचा मृत्यू झाला आहे. काल(गुरुवारी) दिवसभरात तब्बल ४७५ जणांचा इटलीत मृत्यू झाला आहे. तर जगभरामध्ये २४ तासांत जगभरात ९७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

काल इराणध्ये १४७, स्पेनमध्ये १०५, फ्रान्स ८९, अमेरिका ४१ आणि इंग्लडमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. दीडशेपेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत.

अनेक देशांनी विमान सेवा बंद ठेवली आहे. तसेच सार्वजनिक स्थळे बंद करून नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध लादले आहेत. शाळा महाविद्यालयांसह व्यवसायही ठप्प झाले आहेत. कोरोनाला ११ मार्चला जागतिक महामारी घोषित करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.