ETV Bharat / international

43 वे UNHRC सत्र : पाकिस्तानी लष्कर हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू, पोस्टर झळकले

पाक सरकार त्यांचा स्वतःचाच बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभाग असल्याने हे प्रश्न सोडवू इच्छित नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला तंबी द्यावी आणि हे थांबवण्यासाठी तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चळवळीतील कार्यकर्ते करत आहेत.

43 वे UNHRC सत्र
43 वे UNHRC सत्र
author img

By

Published : Feb 29, 2020, 1:09 PM IST

जिनिव्हा - स्वित्झर्लंडमधील आयकॉनिक ब्रोकन चेअर येथे 'पाकिस्तानी लष्कर हा जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू' असे पोस्टर झळकले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचे 43 वे सत्र जिनिव्हा येथे सुरू असताना हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'जगभरात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे पाकिस्तानच आहे, याकडे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष वेधून दहशतवादविरोधी कारवाईची मागणी' याद्वारे करण्यात आली आहे.

जिनिव्हातील ब्रोकन चेअर येथे संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयासमोर बलोच, पश्तून चळवळीतील कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दहशतवादी संघटनांची पैदास करण्यासाठी खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराविरोधात येथे निषेध करण्यात आला.

'जगात कुठेही कोणतीही दहशतवादी घटना घडली तरी त्यामध्ये कुठे ना कुठे तरी पाकिस्तानशी त्याचा संबंध असल्याचे वारंवार समोर आले आहे. नवनवीन दहशतवादी घडवण्यात आणि दहशतवादी संघटनांची पैदास करण्यात पाकिस्तानी लष्कराचा उघड सहभाग आहे, ही बाबही अनेकदा स्पष्ट झाली आहे. याकडे संयुक्त राष्ट्रांचे लक्ष वेधण्यासाठी आणि जागतिक सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या दहशतवादाचा योग्य बंदोबस्त व्हावा,' यासाठी हे पोस्टर लावण्यात आले आहे.

9/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकिस्तान जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू बनला आहे. तर, उत्तर वझिरिस्तानचा अफगाणिस्तानच्या सीमेशी जोडलेला भाग हा तर दहशतवादाचे माहेरघर बनला आहे. या भागातूनच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहशतवादी अल-कायदा आणि तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांशी जोडले गेले आहेत.

पाकिस्तानी सरकार दहशतवादी कारवायांमध्ये सक्रियरीत्या गुंतलेले आहे. या दहशतवादी कारवाया पाकिस्तानात आणि पाकिस्तानाबाहेर घडवून आणल्या जातात. तसेच, पाक सरकार दहशतवादी गटांना मुक्तहस्ताने पाठिंबा आणि अर्थपुरवठा करत आहे.

पाकिस्तानची अनियमित आर्थिक रचना पैशांच्या गैरव्यवहाराचे मार्ग खुले करत आहे. या माध्यमातून दहशतवाद पोसला जात आहे. अहवालांनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी निधी गोळा करणे, योजना बनवणे, संघटन आणि वावरणे या बाबी व्यवस्थितपणे हाताळू शकतात. देशातील भोंगळ राज्यकारभार आणि राजकीय अस्थिरता यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.

पाक सरकार त्यांचा स्वतःचाच बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभाग असल्याने हे प्रश्न सोडवू इच्छित नाही. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानला तंबी द्यावी आणि हे थांबवण्यासाठी तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी चळवळीतील कार्यकर्ते करत आहेत. तसेच, पाकिस्तानात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अमेरिका-तालिबान शांतता करार कतारमध्ये आज, भारतीय प्रतिनिधीही सहभागी होणार

हेही वाचा - कोरोनाचे थैमान : चीनमध्ये मृतांचा आकडा २ हजार ८३५

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.