बीजिंग - सातव्या राष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिनाच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी चिनफिंग यांनी दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमाबाबत सूचना देऊन दारिद्र्यावर पूर्ण विजय मिळवण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा - फ्रान्समधील 'त्या' शिक्षकाला हत्येपूर्वी दिली होती धमकी
'२०२० हे वर्ष समाज आनंदी आणि शांततापूर्ण करण्याचे आणि दारिद्र्य निर्मूलनात निर्णायक विजय मिळविण्याचे वर्ष आहे. कोविड -19 च्या साथीच्या आणि भीषण पूर आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सीपीसी केंद्रीय समितीसमोर वेळेत दारिद्र्य निर्मूलन करण्याचे ध्येय आहे. ते पूर्ण करण्यासाठी समिती कटिबद्ध आहे. दारिद्र्य निर्मूलनाच्या शेवटच्या टप्प्यात पक्ष समित्या आणि विविध स्तरांच्या सरकारांना पूर्ण विजय आवश्यक आहे,' असे ते म्हणाले.
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी गरिबी निर्मूलनाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण पुनरुज्जीवन यांना जोडण्यासाठी सूचना दिल्या.
हेही वाचा - ओसामा बिन लादेनच्या माजी प्रवक्त्याने केली ब्रिटनमध्ये परतण्याची तयारी