ETV Bharat / international

म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान... - म्यानमार मतदान

या निवडणुकीसाठी तब्बल ५,६३९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये ८७ पक्षांच्या विविध उमेदवारांसह २६० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. १,११७ जागांसाठी हे मतदान पार पडत आहे.

Voting begins in Myanmar's general elections
म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान..
author img

By

Published : Nov 8, 2020, 1:38 PM IST

यांगून : म्यानमारमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. सकाळी (स्थानिक वेळेनुसार) सहा वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. देशातील ३७ दशलक्ष नागरिक मतदान करतील. या निवडणुकीसाठी सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनएलडी) पक्षाचे १,१०६ उमेदवार उभे आहेत. तर, युनियन सॉलिडेटरी अँड डेव्हलपमेंट पार्टीचे (यूएसडीपी) १.०८९ उमेदवार उभे आहेत.

८७ पक्ष रिंगणात..

या निवडणुकीसाठी तब्बल ५,६३९ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यामध्ये ८७ पक्षांच्या विविध उमेदवारांसह २६० अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. १,११७ जागांसाठी हे मतदान पार पडत आहे. एकूण उमेदवारांपैकी १,५६५ उमेदवार हे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (कनिष्ठ सभागृह), ७७९ उमेदवार हाऊस ऑफ नॅशनलिस्ट (वरिष्ठ सभागृह), तर ३,११२ उमेदवार हे प्रांतिक किंवा राज्यातील संसदेसाठी उभे आहेत.

विविध ठिकाणच्या निवडणुका रद्द..

निवडणुका निष्पक्षपणे आयोजित करण्यासाठी योग्य वातावरण नसल्यामुळे १५ टाऊनशिप आणि ६६५ गावांमधील निवडणुका रद्द करण्याचा निर्णय देशाच्या निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे दरवर्षी १,१७१ जागांवर पार पडणाऱ्या निवडणुका यावेळी १,११७ जागांवर होत आहेत. तसेच उमेदवारांची संख्याही सहा हजारांहून कमी राहिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी..

या निवडणुकीसाठी एकूण ४२,०४७ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. याठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत हे मतदान पार पडत आहे. देशाबाहेर राहणाऱ्या सुमारे ७५ हजार नागरिकांनी यापूर्वीच आपले मत नोंदवले आहे. तसेच, देशातील तीन दशलक्ष नागरिकांनी पत्राद्वारे आपले मतदान नोंदवल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

सध्या सत्तेत असणाऱ्या एनएलडी पक्षाचा कार्यकाळ २०२१च्या मार्चमध्ये संपत आहे.

हेही वाचा : अमेरिकेच्या नव्या कारभाऱ्यांचे पहिले भाषण... स्पष्ट बहुमताबद्दल नागरिकांचे मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.