ETV Bharat / international

'व्हिजिट नेपाळ 2020' पर्यटन मोहिमेची सुरुवात - 'Visit Nepal 2020'

नेपाळने 'व्हिजिट नेपाळ 2020' या पर्यटन मोहिमेला सुरुवात केली आहे. या पर्यटन मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या दशकात 20 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांना नेपाळमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

'व्हिजीट नेपाळ 2020'
'व्हिजीट नेपाळ 2020'
author img

By

Published : Jan 2, 2020, 12:04 PM IST

काठमांडू - जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळने मात्र, अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत केले. 'व्हिजिट नेपाळ 2020' या मोहिमेची घोषणा करून त्यांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. या पर्यटन मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या दशकात 20 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांना नेपाळमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी दशरथ स्टेडियमवर एकतेची मशाल लावून या मोहिमेची सुरुवात केली. नेपाळ हा जगातील सुंदर पर्यटन स्थळांमध्ये गणला जातो. पर्यटनाच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था सुरू आहे. आम्ही सुरू केलेल्या पर्यटन मोहिमेतून नक्कीच देशाच्या पर्यटन उद्योगाला चालना मिळेल, असे मत भंडारी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - ढोलकी वाजविणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना आणि कार्यक्षमता असते उत्तम

1951 नंतर नेपाळ विदेशी पर्यटकांसाठी खुले करण्यात आला होता. मागील सहा दशकात नेपाळच्या पर्यटनात अमूलाग्र बदल झाले आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून देशाची प्रगती होण्यास मदत होत आहे. त्यामुळेच नेपाळ सरकारने 'व्हिजिट नेपाळ 2020' या मोहिमेची सुरुवात केली आहे, अशी माहिती नेपाळचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री योगेश भट्टारी यांनी दिली.

Intro:Body:

NEWS

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.