ETV Bharat / international

अफगाणिस्तानला असे वाऱ्यावर सोडू शकत नाही; चीनने अमेरिकेवर फोडले खापर - अफगाण तालिबान

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील स्थितीवरून चीनने अमेरिकेवर हल्लाबोल करत यासाठी सर्वस्वी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अमेरिका अफगाणिस्तानला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडू शकत नाही असे चीनने स्पष्टपणे म्हटले आहे.

अफगाणिस्तानला असे वाऱ्यावर सोडू शकत नाही; चीनने अमेरिकेवर फोडले खापर

author img

By

Published : Aug 23, 2021, 5:43 PM IST

बीजिंग : युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील स्थितीवरून चीनने अमेरिकेवर हल्लाबोल करत यासाठी सर्वस्वी बायडेन प्रशासनाला जबाबदार धरले आहे. अमेरिका अफगाणिस्तानला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडू शकत नाही असे चीनने स्पष्टपणे म्हटले आहे.

अफगाणिस्तानातील स्थितीसाठी अमेरिका जबाबदार

अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीसाठी अमेरिका जबाबदार असून याचे मूळ अमेरिकाच आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन सोमवारी म्हणाले. ते अशा प्रकारे इथून पळ काढू शकत नाही. अफगाणिस्तानातील गोंधळ दूर करून इथे स्थिरता आणण्यासाठी तसेच अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी अमेरिकेने मदत केली पाहिजे असे वांग म्हणाले.

अमेरिकेने कटीबद्धता कृतीतून दाखवावी

अमेरिका आपले शब्द आणि कृतीत एकवाक्यता आणेल आणि अफगाणिस्तानात आपली जबाबदारी घेईल अशी आशा मी व्यक्त करतो. अफगाणिस्तानविषयीची विकास, पुनर्बांधणी आणि मानवीय मदतीविषयीची कटीबद्धता अमेरिका कृतीतून दाखवेल असे वांग म्हणाले. अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी तालिबानसह सर्व घटकांसोबत काम करण्याची चीनने तयारी दर्शविलेली आहे हे विशेष.

हेही वाचा - अफगाणिस्तानात सत्तेवर येण्यासाठी तालिबानला पाकिस्तानची मदत, अमेरिकन खासदाराचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.