ETV Bharat / international

अफगाणिस्तानमध्ये लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरांची धडक, १५ जणांचा मृत्यू - अफगाणिस्तानमध्ये दोन हेलिकॉप्टरांची धडक

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार दोन प्रांतांमधील शेकडो तालिबानी दहशतवादी स्थानिक दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून लष्कर गाहला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

काबूल
काबूल
author img

By

Published : Oct 14, 2020, 12:31 PM IST

काबूल - दक्षिणी हेलमंद प्रांतामध्ये लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरांची धडक झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. टोलो प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक राजधानी लष्कर गाहच्या नैऋत्य दिशेला नवा-ए-बरकजाई जिल्ह्यामध्ये मंगळवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार दोन प्रांतांमधील शेकडो तालिबानी दहशतवादी स्थानिक दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून लष्कर गाहला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून या भागात तणावाचे वातावरण आहे. यापूर्वी 24 सप्टेंबर रोजी तांत्रिक बिघाडामुळे उत्तर बागलाण प्रांतात अफगाण हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात दोन पायलटांचा मृत्यू झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.