ETV Bharat / international

पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांकडून 45 प्रवाशांसह बसचे अपहरण - अफगाणिस्तान तालिबान्यांकडून 45 प्रवाशांचे अपहरण

अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात प्रांतात शनिवारी तालिबान्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण केले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समोर आले.

अफगाणिस्तान तालिबान दहशतवादी लेटेस्ट न्यूज

author img

By

Published : Jan 3, 2021, 5:47 PM IST

हेरात - अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील हेरात प्रांतात शनिवारी तालिबान्यांनी प्रवाशांनी भरलेल्या बसचे अपहरण केले आहे. स्थानिक वृत्तसंस्था शमशाद न्यूजच्या हवाल्याने स्पुटनिकने हे वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, दहशतवादी गटाने 45 प्रवाशांचे अपहरण केले आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सातच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समोर आले.

हेही वाचा - अफगाणिस्तानच्या हेल्मंडमध्ये 60 दहशतवाद्यांचा खात्मा

'सशस्त्र बंडखोरांच्या एका गटाने हेरात शहर-तुर्गुंदी महामार्गालगत स्थानिक वेळेनुसार, सकाळी 7 वाजता प्रवाशांनी भरलेल्या बसला चिल्डोखतरण भागात अडवले. येथून या प्रवासी बसला अज्ञात ठिकाणी नेण्यात आले,' अशी माहिती, रुबात-ए-सांगी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख लाल मोहम्मद उमरझाई यांनी सिन्हुआला दिली.

तालिबान्यांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा - नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.