ETV Bharat / international

लष्करी कवायतीतून तैवानने दिला चीनला इशारा!

author img

By

Published : Jul 16, 2020, 3:59 PM IST

या कवायतीमध्ये लढाऊ विमानांतून जमीनीवरील लक्ष्यावर बॉम्ब टाकणे, हेलिकॉप्टरमधून क्षेपणास्त्रे सोडणे, तसेच रणगाडे आणि मिसाईल लॉंचर्समधून मारा करणे अशा गोष्टींचा समावेश होता.

Taiwan
तैवान

तैचुंग : तैवानने गुरुवारी लष्करी कवायतीतून आपले शक्तीप्रदर्शन केले. चीनच्या समोर असलेल्या एका बेटावर ही कवायत घेत त्यांनी चीनला आपल्या ताकदीचा अंदाज दिला. चीनकडून तैवानवर हल्ला झाल्यास त्याला आपण तोंड देऊ शकतो, असे तैवानने यातून दाखवून दिले.

लष्करी कवाय तैवानने दिला चीनला इशारा!

"आमच्या देशाच्या रक्षणासाठी आम्ही घेत असलेली मेहनत आणि प्रयत्न हे संपूर्ण जगाने पहावेत अशी आमची इच्छा आहे"; असे मत यावेळी राष्ट्राध्यक्ष साई इंग वेन यांनी व्यक्त केले. त्या या लष्करी कवायतीला उपस्थित होत्या. पाच दिवसाची ही वार्षिक लष्करी कवायत शुक्रवारी संपणार आहे.

चीन नेहमीच तैवानला आपला प्रांत मानत आले आहे. २४ दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश 'रिपब्लिक ऑफ चायना' नावानेदेखील ओळखला जातो.

हेही वाचा : आता पाकिस्तानमध्येही 'टिक-टॉक'वर बंदी? लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.