काबूल (अफगाणिस्तान) - पूर्व अफगाणिस्तान येथे आज (दि. 3 ऑक्टोबर) एका ट्रकच्या माध्यमातून झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती काबूल येथील सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्व अफगाणिस्तानच्या नानघर्रार प्रांतातील घानीखेल जिल्ह्यात एका मशिदीत दुपारी सुमारे 38 जण नमाज पठण करत होते. त्यावेळी स्फोट झाला, अशी माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ते तारीक अरियन यांनी दिली.
नानघर्रार प्रांताचे प्रवक्ते अत्ताउल्लाह खोग्यानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शस्त्रधारी व्यक्ती या स्फोटानंतर आसपासच्या इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अफगानी सैन्यांनी त्यांना यमसदनी धाडले.
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्यापपर्यंत स्वीकारलेली नाही. मात्र, इस्लामिक स्टेट्स व तालिबानने हा हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - कर्तारपूर कॉरिडॉर पुन्हा उघडणार, कोरोना नियंत्रणात असल्याने पाकिस्तानचा निर्णय