कोलंबो - श्रीलंकेत अध्यक्षीय निवडणुकीत विरोधी पक्षाचे प्रमुख उमेदवार गोताबाया राजपक्षे विजयी झाले आहेत. रविवारी सकाळी साडेचार वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यांना बौद्ध सिंहली समाजाचे संख्याबळ आणि वर्चस्व असलेल्या मतदार संघांमधून भरघोस मते मिळाली.
युद्धकाळातील माजी संरक्षण सचिव असलेल्या गोताबाया यांना ९ जिल्ह्यांतील मते पोस्टाने मिळाली. ते श्रीलंका पोदुजन पेरमुना (एसएलपीपी) या पक्षाचे आहेत,. तर, सध्याच्या सत्ताधारी युनायटेड नॅशनल पक्षाकडून (यूएनपी) निवडणूक लढवणारे उमेदवार सजीत प्रेमदासा यांना ३ जिल्ह्यांमधील मते पोस्टाने मिळाली.
गोताबाया हे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांचे लहान बंधू आहेत. ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, लिट्टे या दहशतवादी संघटनेशी असलेला त्यांचा संबंध देशात चर्चिला गेला. याउलट प्रेमदासा यांची प्रतिमा स्वच्छ मानली जाते. तरीही, जनमत राजपक्षे यांच्या बाजूने गेले आहे.
राजपक्षे ७० वर्षांचे असून हे मतमोजणीदरम्यान आघाडीवरच राहिल्याची माहिती मीडियाने दिली. तर, ५२ वर्षीय प्रेमदासा यांना तामिळींचे वर्चस्व असलेल्या उत्तर आणि पूर्वेकडील काही भागांत जास्तीत जास्त मते मिळाली आहेत.
निकाल :
निवडणुकीचा निकाल पाहिला असता, राजपक्षे यांना ६५ टक्के मते मिळाली आहेत. तर, प्रेमदासा यांना २८ टक्के मिळाली आहेत. प्रेमदासा यांना जाफना, नल्लूर आणि काय्त्स या ३ निवडणूक विभागांतील मते मिळाली. येथे प्रेमदासा यांना राजपक्षे यांच्याविरोधात अनुक्रमे ८५ विरुद्ध ६, ८६ विरुद्ध पाच आणि ६९ विरुद्ध १७ टक्के मिळाली. या दोघांशिवाय इतर उमेदवारांना अत्यंत नगण्य मते मिळाली आहेत.