काबुल - पूर्व अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी स्थानिक पोलीस कमांडरसह सहा पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी स्पुटनिकला शनिवारी दिली.
शुक्रवारी, नांगरार प्रांतातील बाटीकोट जिल्ह्यात तालिबान्यांनी स्थानिक पोलीस दलावर हल्ला चढवला. संध्याकाळपर्यंत हा संघर्ष सुरू होता.
हेही वाचा - बलुचिस्तानात 11 कोळसा खाणकामगारांचे अपहरण, गोळ्या घालून केले ठार
या हल्ल्यात कमांडर ताहिर खान यांच्यासह सहा स्थानिक पोलीस ठार झाले आणि चार जण जखमी झाले, असेही सूत्रांनी सांगितले.
तालिबान्यांनी या चकमकीची पुष्टी केली आणि असे सांगितले की, सहा पोलीस अधिकारी ठार झाले तर नऊ जण जखमी झाले.
दोहाच्या कतारच्या राजधानीत सरकार आणि तालिबानच्या प्रतिनिधी यांच्यात सुरू असलेल्या शांततेच्या चर्चेनंतरही तालिबान्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. सततचे हल्ले, हिंसक संघर्ष आणि बॉम्बस्फोट यामुळे अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सरकार आणि संपूर्ण देश त्रस्त आणि अस्थिर झाला आहे.
हेही वाचा - पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांकडून 45 प्रवाशांसह बसचे अपहरण