ETV Bharat / international

शिंजो आबे यांच्या संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा; योशिहिदे सुगा होणार नवे पंतप्रधान - जपानचे नवे पंतप्रधान

शिंजो आबे यांच्या संपूर्ण कॅबिनेटने आज राजीनामा दिला असून नवीन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. योशिहिदे सुगा (71) हे आज पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतील.

सुगा
सुगा
author img

By

Published : Sep 16, 2020, 12:15 PM IST

टोकियो - प्रकृती अस्वास्थ्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज शिंजो आबे यांच्या संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा दिला असून नवीन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आजच योशिहिदे सुगा (71) हे पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतील.

योशिहिदे सुगा यांच्यापेक्षा कमी वयाच्या आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांनीही अर्ज दाखल केला आहे. यामध्ये माजी संरक्षणमंत्री शिंगेरू इशिबा आणि माजी परराष्ट्रमंत्री फुमिओ किशिदा यांचा समावेश होता. 14 सप्टेंबरला नव्या अध्यक्षासाठी पक्षांतर्गत मतदान झाले. यावेळी योशिहिदे सुगा यांना सर्वांत जास्त 377 मते मिळाली आहेत. सत्तारूढ पक्षाच्या मतदानात 400 लोकप्रतिनिधींना मतदान प्रकियेत सहभाग घेतला होता.

लिबरल डेमोक्रटीक पक्षाचे नवे पंतप्रधान म्हणून योशिहिदे सुगा हे बुधवारी पदभार स्वीकारतील. सुगा यांचे पक्षातील वजनही जास्त आहे. आबे यांची धोरणे आणि योजना पुढे नेण्यासाठी आश्वासक म्हणून नेता म्हणून सुगा यांच्याकडे पाहिले जात आहे. दरम्यान, 28 ऑगस्टला शिंजो आबे यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.