इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कराचीमध्ये बुधवारी सकाळी भीषण स्फोट झाला. यामध्ये तीन जण ठार झाले असून, १५ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कराची विद्यापीठाच्या मस्कान गेटसमोरील एका चार मजली इमारतीत हा स्फोट झाला. हा स्फोट म्हणजे दुर्घटना होती, की हल्ला होता याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. पोलीस सध्या याबाबत तपास करत आहेत.
या स्फोटाची तीव्रता एवढी होती, की आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही त्यामुळे फुटल्या अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
हेही वाचा : अफगाणिस्तानात बॉम्ब हल्ले; पाच ठार, नऊ जखमी