ETV Bharat / international

श्रीलंकेत पुन्हा बॉम्ब स्फोट; तर मध्यरात्रीपासून देशात राष्ट्रीय आणीबाणी

author img

By

Published : Apr 22, 2019, 4:30 PM IST

Updated : Apr 22, 2019, 5:21 PM IST

रविवारी इस्टर डेची संधी साधून दहशतवाद्यांनी विविध ८ ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. त्यामध्ये २९० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, शेकडो लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सांकेतिक छायाचित्र

कोलंबो - श्रीलंकेमध्ये रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय आणिबाणी लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रपती मैत्रिपाल सिरीसेना यांनी याबद्दल घोषणा केली. दरम्यान आज मध्यरात्रीपासून आणीबाणीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर समुद्र किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. घटनेनंतर सुरू असलेल्या तपास मोहिमेदरम्यान कोलंबोच्या चर्च जवळील बस स्थानकाजवळ पुन्हा एक बॉम्ब स्फोट झाला. त्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

'इस्टर संडे'ची संधी साधून दहशतवाद्यांनी विविध ८ ठिकाणी साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. त्यामध्ये २९० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, शेकडो लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये ४ भारतीयांचाही समावेश आहे. तर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली असून घटनेची तिव्रता लक्षात घेता राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणीची जाहीर केली.

बॉम्ब स्फोटानंतर देशभरात शोध मोहिम राबवण्यात आली आहे. त्यामध्ये राजधानी कोलंबोच्या मुख्य बसस्थानकाजवळ पोलिसांना ८७ जिवंत बॉम्ब आढळल्याची बातमी आहे. त्यामुळे धोका अद्यापही कमी झालेला नाही, असे म्हटले जात आहे. समुद्राच्या किनारपट्टी भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच श्रीलंकेच्या सीमेजवळ तैनात असल्येल्या भारतीय नौसेनेला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात विमानवाहक जहाज तैनात करण्यात आले असून प्रत्येक हालचालींवर सैनिकांचे बारीक लक्ष आहे.

Intro:Body:

National News

Conclusion:
Last Updated : Apr 22, 2019, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.