मॉस्को - पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतीन यांनी 'झ्वेझदा शीप बिंल्डींग (जहाज बांधणी) कॉम्लेक्स' ला भेट देली. त्यानंतर दोन्ही नेते २० व्या द्विपक्षीय शिखर बैठकीला जाणार आहेत.
जहाजामधून दोन्ही नेते झ्वेझदा शीप बिंल्डींग कॉम्लेक्सला भेट देण्यासाठी गेले. मोदींनी जहाज बांधणी प्रकल्पांची आणि तेथील कामांची पाहणी केली. दोन्ही देशांमध्ये जहाजबांधणी क्षेत्रामध्ये संधी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी म्हटले आहे.
शीप बिल्डींग प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मोदी आणि पुतीन २० व्या रशिया भारत शिखर बैठकीली जाणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद आणि विविध करारांवर सह्या करण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेनंतर मोदी 'स्ट्रीट ऑफ द फार ईस्ट' या एक्झीबीशनला भेट देणार आहेत. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी 'इस्टर्न इकॉनॉमिक फोरम' या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दोन्ही देशांमध्ये विविध द्विपक्षीय, आंतरराष्ट्रीय, आणि समान हितसंबध असणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, उर्जा, उद्योग आणि दळवणवण प्रकल्प यासंबधीत करारांवर दोन्ही देश सह्या करणार आहेत. भारत रशिया संरक्षण आणि नागरी आण्विक उर्जा क्षेत्रामध्ये एकमेकांना सहकार्य करू शकतात. दोघांमध्ये असलेल्या मैत्रिपूर्ण संबधामुळे हे शक्य असल्याचे मोदी म्हणाले.