ETV Bharat / international

Russia Ukraine War : युक्रेनमधून पाकिस्तानी तरुणीची सुटका, मोदी आणि भारतीय दूतावासाचे मानले आभार - Indian embassy evacuate Pakistani Asma Shafique

आपला देश सोडून युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी युद्ध संकटात ( Russia Ukraine War ) अडकले आहेत. यात भारतासह पाकिस्तानी विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने गंगा मिशन राबवले आहे. या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येत आहे. यातच भारतीय प्रशासानाने एका युक्रेनमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी विद्यार्थींनीला मदत केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कीवमधील भारतीय दूतावासाचे आभार ( Pakistani Student Thanks Indian Embassy ) मानले आहेत.

Pakistani Student Thanks Indian Embassy
युक्रेनमधून पाकिस्तानी तरुणीची सुटका
author img

By

Published : Mar 9, 2022, 10:20 AM IST

कीव - रशिया युक्रेन युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू झाल्यानंतरचा आज 14 वा ( Russia Ukraine War 14th day ) दिवस आहे. या युद्धाचे जगभर परिणाम उमटत आहेत. युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. आपला देश सोडून युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी युद्ध संकटात अडकले आहेत. यात भारतासह पाकिस्तानी विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने गंगा मिशन राबवले आहे. या मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात येत आहे. यातच भारतीय प्रशासानाने एका युक्रेनमध्ये अडकलेल्या एका पाकिस्तानी विद्यार्थींनीला मदत केल्याचे समोर आले आहे. या तरुणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कीवमधील भारतीय दूतावासाचे आभार ( Pakistani Student Thanks Indian Embassy ) मानले आहेत.

  • #WATCH | Pakistan's Asma Shafique thanks the Indian embassy in Kyiv and Prime Minister Modi for evacuating her.

    Shas been rescued by Indian authorities and is enroute to Western #Ukraine for further evacuation out of the country. She will be reunited with her family soon:Sources pic.twitter.com/9hiBWGKvNp

    — ANI (@ANI) March 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अस्मा शफीक असे पाकिस्तानी तरुणीचे नाव आहे. तीला भारतीय संघाने युक्रेनमधून सुखरूप बाहेर काढले आहे. ती लवकरच घरी परतणार आहे. या मदतीबद्दल अस्मा यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय दूतावासाचे आभार मानले आहेत. अस्मा म्हणाली, 'माझे नाव अस्मा शफीक आहे. आम्हाला शक्य ती सर्व मदत दिल्याबद्दल मी कीवमधील भारतीय दूतावासाची आभारी आहे. अतिशय कठीण परिस्थितीत आम्ही इथे अडकलो होतो. मी भारताच्या पंतप्रधानांचा देखील आभारी आहे की त्यांच्यामुळेच आम्ही इथून बाहेर पडू शकले, मदत केल्याबद्दल भारतीय दूतावासाचे आभार, मी सुखरूप घरी जात आहे, असे तीने म्हटलं आहे.

कीवमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी अस्मा शफीकची सुटका केली आहे. ती युद्धग्रस्त भागात अडकली होती. तीने भारतीय दुतावासाशी संपर्क साधला. ती इतर भारतीयांसह पश्चिम युक्रेनमध्ये नेण्यात आले.

युक्रेनमध्ये गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मंगळवारी, काही तास युद्ध थांबल्यानंतर मानवतावादी कॉरिडॉरमधून मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढण्यात आले. अडकलेल्या भारतीयांची आणि इतरांची सुटका करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावर दोन्ही नेत्यांनी काही तासांसाठी युद्ध थांबवण्याचे मान्य केले होते. अनेक वेळा युद्धादरम्यान, संघर्ष थांबवून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. दुसरीकडे, युक्रेनच्या रस्त्यांवर मृतदेह विखुरलेले आहेत. एक गंभीर मानवतावादी संकट उद्भवले आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत.

हेही वाचा - Russia Ukraine War - 'रशियाला दहशतवादी देश घोषित करा'; अमेरिकेची रशियन तेल, गॅस आयतीवर बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.